चित्रकार सुनिल दाभाडे यांना मदर तेरेसा सेवारत्न पुरस्कार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतरत्न मदर तेरेसा यांच्या 114 व्या जयंती उत्सवाच्या शुभ मुहूर्तावर, त्यांच्या कलेद्वारे देशभरात जनजागृती केल्याबद्दल चित्रकार सुनिल दाभाडे कलाशिक्षक मानव सेवा विद्यालय, जळगांव यांना मदर तेरेसा स्वदेश रत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले. आम्हाला कळविण्यात आनंद होत आहे की, सुनिल दाभाडे हे विविध प्रसंगी पर्यावरण संरक्षण जनजागृती आणि शैक्षणिक जनजागृती मोहिमांच्या माध्यमातून समाजात आणि देशात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

विविध प्रसंगी ते आपल्या चित्रांच्या माध्यमातून जनजागृतीचे संदेश देत लोकांसाठी आणि समाजासाठी केलेल्या अमूल्य सेवेचे कौतुक करत उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात असलेल्या शांती फाऊंडेशन गोंडातर्फे चित्रकार सुनिल दाभाडे यांना मदर तेरेसा स्वदेश रत्न पुरस्कार 2024 देऊन सन्मानित करून शिक्षकांसह देशवासीयांचाही गौरव झाला आहे. चित्रकार सुनिल दाभाडे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.एस.डाकलिया, मानद सचिव विश्वनाथ जोशी सर्व पदाधिकारी व सदस्य, प्राथमिक विभागाचा मुख्याध्यापिका माया अंबटकर ,बालवाडी विभागाचा मुक्ता पाटील , माध्यमिक विभागाचा मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी तसेच सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग यांनी सुनिल दाभाडे चे अभिनंदनाचा वर्षाव केला.

Protected Content