हरीविठ्ठल नगरातून विद्यार्थ्याची दुचाकी लांबविली; रामानंदनगर पोलीसात तक्रार

जळगाव प्रतिनिधी । शहरातील हरिविठ्ठल नगरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची घरासमोर लावलेली दुचाकी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना आज शुक्रवार २५ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आली. रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

अधिक माहिती अशी की, भुषण बडगु सावंदे (वय-२१) रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव हा आयटीआयचे शिक्षण घेणार‍ विद्यार्थी आहे. महाविद्यालयात जाण्यासाठी त्याच्याकडे (एमएच १९ डीई ५७०५) क्रमांकाची दुचाकी आहे. २४ डिसेंबर रोजी दुचाकी घरासमोर पार्किंग करून लावली होती. मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास दुचाकी जागेवर होती. आज २५ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास दुचाकी आढळून आली नाही. परिसरात शोध घेवून दुचाकी मिळून न आल्याने रामानंद नगर पोलीसात धाव घेतली. भुषण सावंदे यांनी रामानंदनगर पोलीसात अज्ञात चोरट्‌यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Protected Content