५ जून रोजी भरणारे आठवडे बाजार इतर सोईच्या दिवशी भरवावे – जिल्हाधिकारी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील ६ तालुक्यातील ८ ग्रामपंचयातीमधील रिक्त सदस्य पदासाठी रविवार ५ जून रोजी मतदान होणार असल्यामुळे ५ जून या दिवशीचे आठवडे बाजार इतर सोईच्या दिवशी भरविण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहे.

 

जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील १०० ग्रामपंचायतीतील ११४ रिक्त सदस्य पदाच्या होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मा. राज्य निवडणुक आयोग महाराष्ट्र यांचेकडून पारंपारिक पध्दतीने प्रत्यक्ष निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून पोटनिवडणूकीसाठीची नामनिर्देशन व माघारीची प्रक्रीया पुर्ण झालेनंतर ही मतदान प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

 

ग्रामपंचायत पोटनिवडणूक प्रत्यक्ष सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीचा तपशील मतदान 5 जून,2022 या मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार भरणार असलेल्या गावांची / भागाची यादी खालील प्रमाणे नमुद करण्यात आली आहे. तालुका / ग्रामपंचातीचे  आणि गावाचे नाव –  भसावळ – साकरी, चाळीसगाव- जामडी प्र ब, जामनेर- वडगांव बु., मुक्ताईनगर – कुर्हा, पाचोरा- खेडगाव, यावल- डांभुर्णी, राजोरे, हिंगोणा  या दिवशी भरणारे आठवडे बाजार इतर दिवशी भरविण्यात यावेत, असेही जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!