यावल येथे प्रहार जनशक्तीच्या दिव्यांग विभागाची बैठक

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर यावल येथे प्रहार जनशक्तिपक्षा च्या भुसावळ मार्गावरील कार्यालयात पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटनेचे डॉ. रामदास खोत महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख तथा महासचिव व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या प्रेरनेणे तसेच प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटना, जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष बाळासाहे पाटील यांच्या आदेशाने व जळगाव जिल्ह्याचे सल्लागार शरद बारजिभे व जिल्हा उपाध्यक्ष मिथुन सावखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १ सप्टेंबर रोजी यावल येथे संपन्न झाली.

या बैठकीत भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी याना प्रहार जनशक्ती तर्फे उमेदवारी घोषित झाली. त्या संदर्भात दिव्यांग बांधवानी एकत्रित यावे व मोठ्या उत्साहाने आपल्या पक्षाच्या उमेदवारास निवडणुकीत सहकार्य करावे असे मार्गदर्शक सूचना व कार्यक्रम आखणी बारजिभे यांनी आपल्या भाषणातून सांगितले तसेच यावल तालुका उपाध्यक्ष हरी भाऊ पाटील यांनी देखी भाषणातून दिव्यांग बांधवाना सूचित केले तसेच यावल तालुका अध्यक्ष यांनी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जे दप्तर आहे. त्या संदर्भात आलेल्या बोदवड तालुका अध्यक्ष रमेश लोहार, उपाध्यक्ष संजय कोळी तसेच यावल तालुका महिला आघाडी च्या सरला ताई तायडे इत्यादी पद अधिकारी उपस्थित होते त्यांचे फाईल व दप्तर या कसे असावे या संदर्भात मार्गदर्शन केले. या बैठकीत उपस्थित यावल तालुका उपाध्यक्ष जनार्धन फेगडे, हरिभाऊ पाटील, शहर उपाध्यक्ष दिलीप चौधरी, शहर संघटक भगवान फेगडे, सचिव अरुण ठाकूर, तालुका संघटक ललित पाटील तसेच सभासद अशोक भावसारश्‍ अमृत बारी हे देखील उपस्थित होते व दप्तर संदर्भात मार्गदर्शन एक चित्ताने ग्रहण केले सर्वांचे आभार प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यावल तालुका अध्यक्ष प्रविण सोनवणे यांनी मानले.

Protected Content