वनोलीच्या श्री साईबाबा मंदिरात रविवारी महाप्रसाद

 

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या यावल तालुक्यातील वनोली येथील श्री साईबाबा मंदिरात रविवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

तालुक्यातील तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेल्या श्री साईबाबा देवस्थान वनोली तालुका यावल या मंदिरात सालाबादप्रमाणे नवरात्र उत्सवाची पूर्ण तयारी झालेली असून घटस्थापने नंतर अश्विन शुद्ध अष्टमी ही यावर्षी रविवार दिनांक २२ऑक्टोबर रविवार रोजी येत आहे. त्यादिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे विशेष उपस्थित राहणार असल्याचे या मंदिराचे विश्वस्त तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल चौधरी यांनी सांगीतले आहे.

या मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी व इतर परिसराचा विकास होण्यामागे आजी माजी आमदार व कृषी मित्र माजी खासदार व आमदार स्व .हरिभाऊ जावळे यांचे खरं प्रयत्न आहे त्यासोबतच जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे,खा.रक्षाताई खडसे आमदार शिरीष चौधरी यांनी ही या मंदिराच्या जडणघडणा साठी योगदान केला आहे.

नवरात्रउत्सव हा पावसाळ्यात येत असतो मात्र यावर्षी अधिक श्रावण महिन्यामुळे एक महिना दसरा उशिराने आला त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणावर श्री साईबाबा महाराजांची महाप्रसादासाठी जळगाव जिल्हा भरातूनच नव्हे तर गुजरात मध्य प्रदेश राज्यातूनही लोक या ठिकाणी महाप्रसादाला येतात व येतील असा अंदाज विश्वस्तांनी व्यक्त केला आहे. घटस्थापनेनंतर अष्टमीच्या दिवशी वनोली कोसगाव या छोट्याशा गावांमध्ये जळगाव जिल्हाभरातून नातेवाईक साईबाबा चे दर्शनाला येतात.

दरम्यान, दिनांक २२ ऑक्टोबर रविवार रोजी दर्शनासाठी व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हजारो भाविकांची उपस्थित राहतील. या महाप्रसादांमध्ये उडदाच्या डाळीचे वडे, खीर, गंगाफळ ची भाजी आणि पोळ्या असा मेनू असून रात्री उशिरापर्यंत या महाप्रसादाचे लाभ घेण्यासाठी भाविक येतात.

श्रीक्षेत्र वनोली साईबाबा मंदिराच्या महाप्रसादासाठी जळगाव जिल्हा भरातून भाविकांनी मोठ्या संख्येने शिस्तीने व शांततेने हजेरी लावावी व मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन श्री साईबाबा मंदिर ट्रस्ट विश्वस्त तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल भाऊ चौधरी त्यांचे सर्व सहकारी यांनी केले आहे. यशस्वीतेसाठी विश्‍वस्त मंडळासह सरपंच आणि उपसरपंच व ग्रामपंचायत सर्व सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व संचालक मंडळ आणि साईबाबा मंदिराची भगत आत्माराम सपकाळे आणि वनोली गावचे सर्व ग्रामस्थ हे सहकार्य करत आहेत.

Protected Content