फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील पुर्वी नदी पात्रात एका ६० वर्षीय अनोळखी वृध्दाचा मृतदेह पाण्यात तरंगातांना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी फैजूपर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील पुर्वी नदी पात्रात एका अनोळखी ६० वर्षीय वृध्दाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर फैजपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनस्थळी धाव घेतली. मृतदेहा पंचनामा करून यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. मयताची कोणतीही ओळख पटलेली नाही. याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटवावी असे आवाहन पोलीसांनी केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद गभाणे हे करीत आहे.