मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा जंगलात मालवाहू वाहतूक करणारे वाहन थांबवून बोलेरो वाहनातून आलेल्या पाच जणांनी चालकाचा रस्ता आडवून चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जवळील रोकड, मोबाईल, पाकीट आणि इतर साहित्य चोरून येण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी 27 ऑगस्ट रोजी पहाटे सात वाजता मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, दीपक इच्छाराम पाटील वय-४१, रा. बोरखेडा ता.धरणगाव हा धरून आपल्या परिवारासह वास्तव्याला असून खाजगी वाहन चालून तो आपला उदरनिर्वाह करत असतो. सोमवारी २६ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजता दीपक पाटील हा मालवाहू क्रमांक (एमएच १९ सीवाय ८१४९) या वाहनातून डोलारखेडा गावातील जंगलातून जात असताना त्यावेळी बोलोरे वाहनातून ५ जणांनी दीपक पाटील यांच्या वाहनाचा रस्ता अडविला. या वाहनातून विनय प्रमोद चौधरी रा. शिरसोदा ता, बऱ्हाणपूर, राहुल बाळू तायडे, आकाश रवींद्र पाटकर दोन्ही रा, इच्छापुर ता.जि.बऱ्हाणपूर, सौरव उखा पाटील आणि राजू बेलदार दोन्ही रा. अंतुर्ली ता. मुक्ताईनगर यांनी चालक दीपक पाटील यांना बेदम मारहाण करून त्यांच्या खिशातील ५ हजार ७०० रूपयांची रोकड, मोबाईल, पाकीट आणि इतर साहित्य जबरी हिसकावून पळून गेले. या घटनेबाबत चालक दीपक पाटील यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश पाटील करीत आहे.