मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यात काही दिवसांपासून डेंगू या डासांमुळे प्रसरणाऱ्या आजारांने थैमान घातले आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुक्ताईनगर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अमितकुमार घडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ सुहास सपकाळ, तालुका हिवताप पर्यवेक्षक श्री व्ही. वाय. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य सहाय्यक व्ही. एस. पाटील, आरोग्य सहाय्यिका आर. डी. खरबडकर, आरोग्य निरीक्षक ए. एम. भोपळे यांच्या निरीक्षणाखाली शहरातील नवीन गाव व जुने गाव या संपूर्ण भागात डेंग्यू व चिकन गूनिया आजाराबाबत जनजागृती तसेच जलद ताप व कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले.
आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळायचा, परिसर स्वच्छ ठेवावा, झोपताना मच्छर दानीचा वापर करावा, दार किडक्याना जाळी बसवा अशा प्रकारे जनजागृती करण्यात आली त्यामध्ये सर्व आरोग्य सेवक, सर्व आरोग्य सेविका व सर्व आशा कार्यकर्ती यांनी सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले