पैरालम्पिक खेळासाठी ८४ खेळाडूंचा भारतीय पथक पॅरिसला रवाना

दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पॅरिस पैरालम्पिक खेळासाठी भारताचे पथक सज्ज झाले असून भारतीय पॅराखेळाडूंच्या मदतीला यंदा ९५ विविध अधिकारी तैनात असणार आहेत. पैरालम्पिकमध्ये भारताकडून ८४ खेळाडू पदक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार आहे. त्यांच्या दिमतीला ९५ अधिकारी असणार आहेत.

भारतीय पैरालम्पिक समितीचे अध्यक्ष देवेंद्र झाझरिया यांच्यासह भारतीय खेळाडू रविवारी पॅरालिंपिकसाठी पॅरिसला रवाना झाले. पॅरिस पॅरालिंपिकसाठी भारताचे पथक एकूण १७९ जणांचे असणार आहे. ९५ पैकी ७७ व्यक्ती या सांघिक अधिकारी असणार आहेत. वैद्यकीय टीममध्ये नऊ व्यक्तींचा समावेश आहे, तसेच नऊ व्यक्ती इतर अधिकारी म्हणून कार्यरत असणार आहेत.

Protected Content