ऍप बंदीवर चीन नाराज

 

 

बीजिंग, वृत्तसंस्था । भारताने चीनवर पुन्हा एकदा डिजीटल स्ट्राइक केला. केंद्र सरकारने पुन्हा एकदा चीनच्या ११८ अॅपवर बंदी घातली. भारताच्या या निर्णयावर चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली आहे.

भारताने आतापर्यंत चीनच्या २२४ अॅपवर बंदी घातली आहे. भारताने सुरक्षितेच्या कारणास्तव चिनी कंपनीच्या ११८ अॅपवर बंदी घातली. यामध्ये पबजी, लिविक, व्हीचॅट वर्क आणि व्हीचॅट रीडिंग, अॅपलॉक, केरम फ्रेंड्स यासारख्या अॅप्सचा समावेश आहे.

चीनच्या वाणिज्य खात्याने म्हटले की, भारताने अॅप बंदीचा निर्णय घेणे म्हणजे चिनी गुंतवणूकदार आणि सेवा पुरवठादारांच्या कायदेशीर अधिकारांचे हनन करण्यासारखे आहे. चीन या बंदीच्या निर्णयाला घेऊन गंभीर असून त्याचा पूर्णपणे विरोध करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रातील मोदी सरकारने याआधी व्हीचॅट, टिकटॉक सह ५९ चायनीज अॅप्सवर बंदी घातली होती. देशातील युजर्संची खासगी सुरक्षा धोक्यात येत असल्याने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला होता. याआधी केलेल्या अॅप बंदीमुळे चीनला मोठा आर्थिका फटका बसला होता. टिकटॉक बंदीनंतर बाइट डान्स या मूळ कंपनीला अब्जावधींचे नुकसान सहन करावे लागले होते.

Protected Content