वडजी विकासोच्या चेअरमनपदी कमलबाई पाटील यांची बिनविरोध निवड

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील वडजी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी कमलबाई वना पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रंगराव पाटील यांनी चेअरमनपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवड घेण्यात आली.त्यात कमलबाई पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध जाहीर करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंध महेश कासार यांनी निवडणूक सहाय्यक म्हणून सचिव रविंद्र पाटील यांनी काम पाहीले. निवड जाहीर झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी चेअरमन बी.वाय पाटील, व्हाईसचेअरमन गंगाराम राठोड, संचालक नानासाहेब परदेशी, राजेंद्र सोनवणे, रफुद्दीन शेख, राजेंद्र पाटील, उपसरपंच स्वदेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिनेश परदेशी, पत्रकार सुधाकर पाटील, डॉ. दिपक पाटील, माजी उपसरपंच समाधान पाटील, रंगराव पाटील, तंटामुक्त समीतीचे अध्यक्ष विजय पाटील, रणधीर पाटील, महारू पाटील, भाईदास पाटील, नामदेव पाटील, शालिक पाटील, दिपक पाटील, राजेंद्र पाटील, प्रदिप पाटील, कैलास पाटील आदि उपस्थित होते.

Protected Content