अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील रंजाने येथील शेतकरी हे केटी वेअरच्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेले असता त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना गुरूवारी २२ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी दुपारी १२ वाजता मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विश्वास तुकाराम मालचे वय ५० रा. रंजाने ता. अमळनेर असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील रंजाने गावात विश्वास मालचे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. शेती काम करून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. बुधवारी २१ ऑगस्ट रोजी दुपारी रंजाने शिवारातील केटी वेअरच्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान, पोहण्याचा अंदाज न अल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरूवारी २२ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता त्याचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला. याबाबत मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीआहे. पुढील तपास पोहेकॉ संजय पाटील हे करीत आहे.