जिल्हा योगासन स्पोर्टस् असोसिएशन तर्फे जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नॅशनल योगासन स्पोर्टस फेडरेशन द्वारा पाचवी नॅशनल योगासन स्पोर्टस चॅम्पियनशिप आगामी काळात होणार आहे. त्यामध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या राजस्तरीय योगासन संघाची निवड ही राज्य योगासन स्पर्धेतून केली जाणार आहे. त्या अनुषंगाने या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेतून राज्य संघात निवड होणे गरजेचे आहे. त्या हेतूने जळगाव जिल्हा योगासन स्पोर्टस असोसिएशन द्वारा जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा सोहम योग विभाग, मू. जे. महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये झाली.

ही स्पर्धा सब ज्युनियर गट वय वर्ष १० ते १४, ज्युनियर गट वय वर्ष १४ ते १८ आणि सिनिअर गट वय वर्ष १८ ते २८ मुल व मुली, तसेच या वर्षी नवीन समाविष्ट झालेले नवीन गट म्हणजे सिनिअर ‘अ ’गट २८ ते ३५ सिनिअर ‘ब’ गट ३५ ते ४५ आणि सिनिअर ‘ क’ गटात ४५ ते ५५ महिला व पुरुष अशा एकूण सहा गटांमध्ये स्पर्धा होती. स्पर्धेच्या उद्घाटनीय कार्यक्रमाला अध्यक्ष पदी मू. जे. महाविद्यायलयाचे सतीश मोहगावकर, टेक्निकल डायरेक्टर नॅशनल योगासन स्पोर्टस फेडरेशन, मू .जे. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचाकल डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर, सोहम योग विभाग संचालक डॉ. देवानंद सोनार उपस्थित होते.

समारोप कार्यक्रमाला व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मू.जे.महाविद्यालयाचे जिमखाना प्रमुख डॉ. चेतन महाजन होते. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर उपविभागीय क्रीडा कार्यालयाचे क्रीडा प्रमुख गौरव जयंत जोशी होते. तसेच सोहम योग विभाग संचालक डॉ. देवानंद सोनार, जळगाव जिल्हा योगासन स्पोर्टस असोसिएशनचे सचिव प्रा. पंकज खाजबागे उपस्थित होते. मान्यवरांनी स्पर्धक, पालक, आणि प्रशिक्षकांना योग आणि योगासन स्पर्धांचे आधुनिक युगातील महत्व पटवून दिले. स्पर्धेतील खेळाडूंना भविष्यात उपलब्ध संधीविषयी यावेळी माहिती देण्यात आली.

या स्पर्धेतून महाराष्ट्र राज्याच्या राजस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. त्यामध्ये खालील विविध गटातील खेळाडूंची निवड करण्यात आली.
राजस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झालेली गटानुसार स्पर्धक :-
अ) ट्रॅडिशनल योगासन इव्हेंट :
१)सब ज्युनियर गट वय वर्ष १० ते १४ मुली :
प्रथम – सानवी सुयेस बुरकुले, द्वितीय – फाल्गुनी प्रमोद चौधरी , तृतीय – विजेता विजय कावडीया
२) सब ज्युनियर गट वय वर्ष १० ते १४ मुले :
प्रथम – मोहित संजय बिर्हाडे, द्वितीय – विवेक अमोल सूर्यवंशी, तृतीय – वेदांत योगेश भोई
३) ज्युनियर गट वय वर्ष १४ ते १८ मुली:
प्रथम – गौरी गणेश महाजन, द्वितीय – सुरभी अतुल चौधरी , तृतीय – निकिता नितीन पाटील
४) ज्युनियर गट वय वर्ष १४ ते १८ मुले:
प्रथम – निखील संतोष भोई , द्वितीय – दर्शन संदीप महाजन , तृतीय – प्रसाद राहुल येवले
५) सीनियर गट वय वर्ष १८ ते २८ मुली :
प्रथम – चैत्राली भूषण सैंदाणे , द्वितीय – नैना नरेंद्र वाघ , तृतीय – पोर्णिमा कैलास पाटील
६) सीनियर गट वय वर्ष १८ ते २८ मुले :
प्रथम – सचिन किशोर जोहारे, द्वितीय -शाहीदखान पठाण , तृतीय – आशितोष संतोष भोई
७) सिनिअर ‘अ’ गट वय वर्ष २८ ते ३५ महिला :
प्रथम – क्रांती नरेंद्र गुरव ,
८) सिनिअर ‘ब ’ गट वय वर्ष ३५ ते ४५ महिला :
प्रथम – डॉ.शरयू जितेंद्र विसपुते , द्वितीय- गीता बाबुराव तीर्थंकर ,तृतीय- स्नेहल प्रशांत अग्रवाल
९) सिनिअर ‘क ’ गट वय वर्ष ४५ ते ५५ महिला :
प्रथम – साधना संजय बोंडे , द्वितीय – अमिता अतुल सोमाणी
१०) सिनिअर ‘क ’ गट वय वर्ष ४५ ते ५५ पुरुष : प्रथम – नारायण पुरणचंद लाहोरी
ब) आर्टिस्टिक सिंगल
१) सब जुनिअर गट वय वर्ष १० ते १४ मुली :
प्रथम- हर्षली संजय बिर्हाडे, द्वितीय- ऐश्वर्या सतीश खडके ,तृतीय- सानवी सुहास बुरकुल
२) सब जुनिअर गट वय वर्ष १० ते १४ मुले : प्रथम – मोहित संजय बिर्हळे , द्वितीय- आरव अतुल झवर
३) ज्युनियर गट वय वर्ष १४ ते १८ मुली:
प्रथम – गौरी गणेश महाजन, द्वितीय- सुरभी अतुल चौधरी , तृतीय – वैष्णवी बाबासाहेब आमटे
४) सिनिअर गट वय वर्ष १८ ते २४ मुली :- प्रथम – संजना सुरेन सुरवाडे
ड) आर्टिस्टिक पेअर
१) सब जुनिअर गट वय वर्ष १० ते १८ मुली : प्रथम- फाल्गुनी प्रमोद चौधरी,हर्षली संजय बिर्हळे
२) सब जुनिअर गट वय वर्ष १० ते १८ मुले :
प्रथम – मोहित संजय बिर्हाडे ,आयव अतुल झवर , द्वितीय- प्रेम योगेश माळी , द्रवर्ष मिलिंद कोल्हे
३) ज्युनियर गट व…

Protected Content