दुचाकीच्या भीषण आपघातात तरूण ठार तर दुसरा गंभीर जखमी

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील सुनसगाव रस्त्यावरील महेंद्रा शोरूम येथे जात असताना स्पीडब्रेकरवरून दुचाकी उधळून डिव्हायडरला धडक लागल्याने वाहनावरील तरुण ठार झाल्याची घटना शनिवारी ६ जुलै रोजी रात्री ११ वाजता घडली. तर त्याचा मित्र आकाश पाटील हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. स रविवारी ७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. महेश रामभाऊ माळी (वय २५, रा. जाकीर हुसेन कॉलनी, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, महेश माळी हा तरूण जळगाव शहरातील जाकीर हुसेन कॉलनीत वास्तव्याला होता. एमआयडीसीतील एका दाल मिल कंपनीत तो काम करीत होता. तर त्याचे आई वडील हे एमआयडीसीतील एका कंपनीत वॉचमन आहेत. महेश व त्याचा मित्र आकाश पाटील हे नशिराबादच्या पुढे महेंद्र शोरूम येथे कामानिमित्ताने ये जा करायचे. शनिवारी ६ जुलै रोजी ते रात्री महेंद्र शोरूम येथे गेले होते. त्यावेळेला रात्री ११ वाजेच्या सुमारास सुनसगावाजवळ गतिरोधकावरून त्यांची दुचाकी हि नियंत्रणाबाहेर गेली व दुभाजकाला धडकली.

या भीषण अपघातात महेश माळी व आकाश पाटील गंभीर जखमी झाले. दरम्यान, महेश याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. पाच बहिणींच्या पाठीवरील एकुलता एक भाऊ असल्याने कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान, आकाश पाटील हा जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content