बोराडे शिवारातून चोरट्याने सागवान झाड कापून नेले

यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील बोराडे शिवारातील सागवान झाड अज्ञात चोरट्याने मध्यरात्री कापुन लाकूड चोरुन नेल्याचा प्रकार रविवारी २६ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीला आला आहे. या प्रकरणी यावल वनविभागाकडे तक्रार देण्यात आली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील बोराडे शिवारातील गट नंबर ४३ येथे शुभांगी शरद पाटील यांच्या मालकीचे शेत आहे. त्यांच्या शेतात २५ मीटर उंचीचे सागवान झाड आहे. २५ डिसेंबर रोजी रात्री ८ ते रविवार २६ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शुभांगी पाटील यांच्या शेतातील सागवान झाड कापून लाकूड चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. यासंदर्भात शेतमालक शुभांगी पाटील यांनी वन विभागाकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार यावल वनविभागाचे वनपाल हरीपुरा यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. असता १५ हजार रुपये किमतीचे सागवान झाड बुंध्यापासून कापून नेल्याचे दिसून आले. वनपाल यांनी पंचनामा केला. याप्रसंगी पंढरी अडकमोल, विनोद पाटील यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला. शेतमालक शुभांगी पाटील यांनी यावल वनविभागाकडे अज्ञात चोरट्याने विरोधात तक्रार दिली आहे. याबाबत अद्यापपर्यंत पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती.

Protected Content