स्वाभिमानीचे प्रकल्प कार्यालयात सहविचार सभेचे आयोजन

पाचोरा, प्रतिनिधी | आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांच्या समस्येबाबत स्वाभिमानी शिक्षक – शिक्षकेतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल येथे नुकतेच सहविचार सभेचे राज्याध्यक्ष भरत पटेल यांच्या मार्गदर्शनाने आयोजन करण्यात आले होते.

 

आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून आदिवासी आश्रमशाळा सुरू आहेत. आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या भेडसावत आहेत. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रकल्प कार्यालय यावल येथे सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रकल्पाधिकारी विनीता सोनवणे उपस्थित होत्या. यावेळी परिभाषित अंशदान निवृत्तीवेतनाचा हिशोब मिळून खात्यावर जमा करण्यात यावा. डीसीपीएस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसास शासन निर्णयानुसार दहा लाख अर्थसहाय्य देण्याची कार्यवाही करावी. तीन लाभांच्या सुधारित आश्वासित प्रगती योजनेच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात यावी. तसेच ज्या मुख्याध्यापकांनी प्रस्ताव पाठवले नसेल त्यांना प्रस्ताव पाठवण्यास आदेशित करावे. वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण करण्याच्या अटीवर प्राप्त प्रस्तावांना मंजुरी द्यावी. सहाव्या वेतन आयोगातील फरक डी.सी.पी.एस. कर्मचाऱ्यांना त्यांना द्यावा. ज्या ठिकाणी उच्च माध्यमिक आश्रम मशाळा आहेत त्याठिकाणी शासन निर्णयानुसार प्रयोगशाळा परिचर यांना सहायक पदावर पदोन्नती देण्यात यावी. यावेळी राज्य उपाध्यक्ष विजय कचवे, विनोद पाटील, आबा पाटील, भालचंद्र पाटील, भूषण भदाणे, रमेश साबळे, रजनीकांत भामरे, प्रवीण बिरारी, सुभाष गाडे, प्रमोद पाटील, पंकज पाटील, व्ही. पाटील, सतीश पाटील, एस. एल. अलोने, नरेंद्र पाटील, राहुल काचोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content