Home क्राईम भोरस येथून ५३ वर्षीय व्यक्ती बेपत्ता

भोरस येथून ५३ वर्षीय व्यक्ती बेपत्ता

0
38


चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील भोरस येथील ५३ वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात हरविल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील भोरस येथील रमेश एकनाथ सोनार (वय-५३) हे २५ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घरात कोणालाही काही एक न सांगता निघून गेला आहे. त्यावर घरच्यांनी परिसरासह नातेवाईकांकडे आजपावेतो शोधाशोध केली असता तो मिळून आला नाही. म्हणून घरच्यांना सोनार हरविल्याचे खात्री झाल्याने चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानक गाठून मुलगा ज्ञानेश्वर रमेश सोनार यांच्या फिर्यादीवरून हरविल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोलीस हवालदार महाजन हे करीत आहेत.


Protected Content

Play sound