यावल येथे क्रिडा स्पर्धा नियोजनाची बैठक

यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय व यावल पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने यावल तालुका शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन व नियोजन संदर्भात बैठक घेण्यात आली.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके, क्रीडा शिक्षक महासंघ तालुकाध्यक्ष, मुख्याध्यापक के. यु. पाटील आदी उपस्थित होते.

या बैठकीत क्रीडा अधिकारी जळंगाव रवींद्र नाईक यांनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा कार्यक्रम निश्चित करणे व विविध शासकीय योजना बाबत मार्गदर्शन व चर्चा केली. तसेच क्रीडा मार्गदर्शक मिनल थोरात यांनी तालुकास्तर व जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी क्रीडा शुल्क भरणे बाबत ऑनलाईन प्रशिक्षण दिले प्रवेशिका ऑनलाईन किंवा ऑफलाइन भरणे बाबत माहिती क्रीडा संयोजक दिलीप संगेले यांनी दिली.

सदर सभेत तालुक्यातील प्रत्येक शाळेतील क्रीडा शिक्षकांनी स्पर्धा तयारी करून संघ उपस्थित राहण्याचे आवाहन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी यावेळी केले व तसेच यावल तालुका क्रीडा समिती व सर्व क्रीडा शिक्षक यांनी जितेंद्र फिरके, डॉ डि के चौधरी विद्यालय डार्भुर्णी यांची यावल तालुका शिक्षक पतपेढीत संचालकपदी निवडून आल्याबद्दल अभिनंदन व सत्कार करण्यात आला तसेच सैयद अशंपाक अली अंजुमन उर्दु हायस्कुल साकळी हे सेवानिवृत्ती बद्दल विशेष सत्कार करण्यात आले.

तालुक्यातील मुख्याध्यापक के.एस. पाटील, मुख्याध्यापक पी.बी. पाटील पर्यक्षेक के.आर. सोनवणे, वाय.वाय. पाटील, उपमुख्याध्यापक आर.एच.जावळे, आर.आय. तडवी, चिमणकारे, शेख सलीम शेख साजीद, वसीम शेख,अबु सुफियान, पी पी महाजन, योगेश कोळी, बी. डी. पाटील, एन.सी. पाटील, गोपाळ, ठाकूर, प्रा.बोदडे, ए.डी. पाटील , शेख शाकीर शेख अख्तर, शिकोकार सर, पी.एम. पाटील, सौ. डी. डी. ठाकरे, श्रीमती आर. एम. पाटील व सर्व शाळेतील क्रीडा शिक्षक बैठकीस उपस्थित होते.

Protected Content