वळणावर चारचाकी वाहन पलटी; तीन जण गंभीर जखमी

पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील लासगाव जवळील वळणावर चारचाकी वाहन उलटल्याने ३ जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवार १७ मे शुक्रवार रोजी सकाळी ११.३० वाजता घडली आहे. जखमी झालेल्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलिसात अद्याप कुठलीही नोंद करण्यात आलेले नाही.

पाचोरा तालुक्यातील लासगाव जवळील वळणावर पाचोर्‍याकडून जळगाव येथे जात असताना एक चारचाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने वळणावरील लोखंडी कठड्याला आढळून वाहन उलटी झाली. या अपघातात चालकासह इतर दोन जण जखमी झाले. यात कुणाल विनायक पाटील वय-२३, अनिकेत शिंदे वय-१८, आणि ओम शिंदे वय-१७ तिघे राहणार नाशिक हे तीन जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने खाजगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेबाबत पोलिस ठाण्यात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content