धावत्या रेल्वेखाली आल्याने एकाचा जागीच मृत्यू

अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील बाम्हणे येथील ४१ वर्षीय इसमाचा मृतदेह कळंबु गावाजवळील बोगद्याजवळ रेल्वे रुळावर आढळून आल्याची घटना शुक्रवारी १७ मे रोजी सकाळी ११ वाजता उघडकीला आली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात आकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील बाम्हणे येथील दगडू बारीकराव पाटील (वय ४१) यांचा मृतदेह १७ रोजी सकाळी ११ वाजता अमळनेर तालुक्यातील कळंबु गावाजवळील रेल्वे रुळावर पोल क्र. २३१च्या १ आणि ३ च्या दरम्यान आढळून आला. रेल्वेखाली कापल्या गेल्याने मृतदेह छिन्नविच्छिन्न झाला होता. खिश्यात असलेल्या मोबाइलवरून त्यांची ओळख पटली. दरम्यान ही घातपात की आत्महत्या याबाबत साशंकता असून पाडळसे स्टेशन मास्टर यांनी मारवड पोलिसांत फिर्याद दिली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेकों भरत श्रीराम इशी हे करीत आहेत.

Protected Content