भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पोलीस प्रशासनातर्फे मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या निखील राजपूत व त्याच्या सहकार्यांची प्रॉपर्टी जप्त करण्याआधी त्यांना उपस्थित राहण्यासाठी पोलिसांनी मुदत दिली आहे.
येथील गुंड निखील राजपूत आणि त्याच्या सहकार्यांच्या विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. तर अलीकडच्या काळात निखील राजपूतसह त्याच्या टोळीतील इतर गुंड फरार झाले असल्याने पोलीस प्रशासनाने त्यांची प्रॉपर्टी जप्त करण्याची कारवाई सुरू केलेली आहे.
दरम्यान, मालमत्ता जप्त करण्याआधी पोलिस प्रशासनाने निखील राजपूत व त्याच्या टोळक्याला हजर राहण्यासाठी १९ मे पर्यंतची मुदत दिलेली आहे. या कालावधीत ते पोलिसांसमोर हजर न झाल्यास त्यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या सूत्रांनी दिली आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.