पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर येथून जवळच असलेल्या पाळधी, येथील धनराज शेनफडू बाविस्कर (वय ३६) हे सुप्रीम कंपनीत कामाला होते. काम संपल्यावर घरी येताना त्यांचा अपघातात मृत्यू झाला.या मयत मित्राच्या कुटुंबीयांसाठी दहावी सन २००० या वर्गात असलेले मित्र सरसावले असून त्यांनी सर्वांनी एकत्र येत २१ हजाराची मदत केली आहे. मैत्री म्हणजे सुखामध्ये समोरच्याला हात देणं, मैत्री म्हणजे दुःखात समोरच्याचा हात होणं तसेच “जिंदगी के साथ भी ओर जिंदगी के बाद भी” असं म्हण या ठिकाणी तंतोतंत लागू पडली. अन् हे मित्रत्व पाहून अनेकांनी या मैत्रीला सलाम केला आहे.
२८ एप्रिल रोजी पाळधी येथील धनराज शेनफडू बाविस्कर (वय ३६) हे सुप्रीम कंपनीत गेल्या वर्षांपासून कामाला होते. काम संपल्यानंतर घरी येत असताना त्याचे अपघाती निधन झाले. धनराज हा घरातील कर्ता पुरुष असल्याने त्याच्या जाण्याने पत्नी, आई, वडील व मुले असा संपूर्ण परिवार हवालदिल झाला. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची व गरिबीची असल्याने आपल्या या मित्राच्या कुटुंबाला थोडासा आर्थिक हातभार लागावा या उद्देशाने वर्गमित्रांनी आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर मॅसेज टाकला. सर्वांनी यथाशक्ती मदत केली. यात २१ हजार रुपये जमा झाले व ही रक्कम धनराज बाविस्कर यांच्या परिवाराला देण्यात आली. यावेळी दिनेश परदेशी, सुरेश माळी, संजय चौधरी, भागवत इंगळे, सुनील सांवळे, रामलाल शिंदे, अर्जुन माळी, गणेश वाणी, बालू परदेशी, कैलास सोनवणे, संजय शेळके हे उपस्थित होते. मित्राच्या दुःखात सहभागी होऊन या वर्गमित्रांनी मैत्री जपल्याने परिसरात याबाबत कौतुक केले जात आहे.