मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महिला कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश

अमळनेर -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । अमळनेर येथे मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत एरंडोल तालुक्यातील शेकडो महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष जाहीर प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत एरंडोल तालुक्यातील महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे याप्रसंगी पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. संभाजी राजे पाटील जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्यासह अधिक उपस्थित होते

मंत्री अनिल पाटील यांनी सर्व महिला भगिनींचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले. यावेळी जि प सदस्या जयश्री पाटील, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अभिलाषा रोकडे डॉ अनघा पाटील, एरंडोल विधानसभा क्षेत्रप्रमुख डॉ महेश पाटील, एरंडोल महिला तालुकाध्यक्ष जयश्री पाटील उपस्थित होते. महिला सन्मानासाठी व सबलीकरणासाठी कायमच तत्पर असणाऱ्या या पक्षात सर्व भगिनींचे स्वागत केले असून त्यांच्या येण्याने पक्षाची ताकद अजून वाढली असून पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी त्या सक्रियपणे कार्यरत राहतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Protected Content