बसस्थानक आवारात चालक व वाहक यांच्याकडून प्रवासी महिलेचा विनयभंग

अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील बसस्थानक परिसरात बस चालक व वाहक या दोघांकडून एका प्रवासी महिलेचा विनयभंग करत तिच्या पतीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुरुवारी बसचालक व वाहक या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, अमळनेर बसस्थानक येथे कल्याण येथे राहणाऱ्या २२ वर्षीय महिला ही आपल्या पतीसह रविवार १४ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता अमळनेर बसस्थानक आवारात आलेल्या होत्या. त्यावेळी बस कोठे जात आहे,? असे विचारणा केल्याचा राग आल्याने बसचालक समाधान भगवान लांडगे व वाहक दर्शन सोमवंशी दोन्ही रा. दहिवद ता. अमळनेर यांनी महिलेला अश्लील शिवीगाळ करत विनयभंग केला तर महिलेच्या पतीला मारहाण केली. दरम्यान या घटनेनंतर महिलेने गुरुवारी १८ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन बसचालक आणि वाहक या दोघांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार अमळनेर पोलीस ठाण्यात चालक समाधान भगवान लांडगे आणि वाहक दर्शन समावेशी दोन्ही रा. दहिवद ता. अमळनेर यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पवार हे करीत आहे.

Protected Content