पाडळसरे ग्रामपंचायतीतर्फे मंत्री पाटील यांचा सत्कार

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  | पाडळसरे येथे मंत्री अनिल पाटील यांनी भेट दिली असता येथील ग्रामपंचायतीतर्फे यावेळी सत्कार करण्यात आला. येथील निम्न तापी प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याने धरणाच्या कामाला गती मिळणार आहे.

लवकरच प्रधान मंत्री कृषी संजीवनी योजनेत समावेश होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. म्हणून मंत्री अनिल पाटील यांची पाडळसरे पुनर्वसित गावात येताच फटाक्याच्या  आतिषबाजीत त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी येथील ग्रामपंचायत सरपंच  शुभांगी सचिन पाटील, उपसरपंच  शिवाजी कोतिक पाटील ,सदस्य  ज्ञानेश्वर पंडीत पाटील,  दिलबर  पुजू  भिल,  भारती  जयसिंग कोळी, कविता समाधान पाटील, अक्काबाई  भिकन  भिल, वच्छलाबाई  रंगा भिल,  विकास सोसायटीचे संचालक सचिन पाटील, पाडळसरे पुनर्वसन समितीचे अध्यक्ष भागवत पाटील, वसंतराव पाटील, डिगंबर पाटील, विश्वास  कोळी,  सुकदेव कोळी, भावना  पाटील,  रविंद्र पाटील, मंगल  पाटील,  मधुकर पाटील, सचिन  पाटील,  संजय पाटील,  जयसिंग  कोळी, छबीलाल पाटील, छगन  पाटील, सुधाकर पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

धरणाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याने धरणाच्या कामाबरोबर भविष्यात पुनर्वसनाच्या कामाला ही गती प्राप्त होईल अशी आशा पल्लवीत झाल्याने पाडळसरे ग्रामस्थांनी मंत्री अनिल पाटील यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

Protected Content