अमळनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे भवानी मातेचा यात्रोउत्सव मंगळवार 16 रोजी होणार असून दरवर्षी चैत्रशुद्ध अष्ठमिला हा यात्रोउत्सव भरविला जातो. या यात्रोउत्सवला शतकी परंपरा असून या यात्रोउत्सव दरम्यान भाविकांची नवस फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.
गावाच्या दक्षिणेला लहान भवानी मातेचे मंदिर असून गावापासुन 2 किलोमीटर अंतरावर शहापुर रसत्यालागत मोठ्या भवानी मातेचे मंदिर आहे.गेल्या शंम्भर वर्षपूर्वी या दोन्ही भवानी मातेच्या मंदिराची स्थापना केली असल्याचे सांगितले जाते. मोठी भवानी व लहान भवानी माता या दोन्ही बहिनी असून जागृत देवस्थान असल्याचीही महती गावासह भाविकांकडून सांगितले जाते.या यात्रोउत्सव दरम्यान गावासह बाहेरील भाविकही वरण बट्टीचा नवस याठिकाणी फेडतात.नवसपूर्ण झाल्याचाही भाविकांकडुन बोलले जाते.
यात्रोउत्सवात मोठ्या भवानी मातेच्या मंदिरावर सर्व्यांत अगोदर मान देऊन यात्रोउत्सवाला सुरुवात होते.सकाळी भल्या पहाटे मोठी भवानी मातेचा भक्त दंगल बडगुजर ध्वज चढवितात.त्याचप्रमाणे लहान भवानी मातेच्या मंदिरावर श्रावण चौधरी यांच्या परिवाराकडून परम्परेनुसार ध्वज चढ़विला जातो.यानंतर महाआरती होऊन दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. लहान भवानी मातेचे भक्त गुलाब महाजन हे वर्षभर पूजा- अर्चा करतात त्यांचीही वडिलोपार्जित ही निस्वार्थी सेवा असून मातेच्या श्रद्धास्थान असल्याने ग्रामदैवत असल्याने दरवर्षी या यात्रोउत्सवला बाहेरगावी गेलेले भाविक गावात यात्रोउत्सव साठी येतात.अष्टमीच्या दिवशी गावातील माळी समाजातील सैंदाने परिवाराची कुलदेवता इंदासीमाता व नवमीच्या माळी समाजातील वाघ परिवाराची कुलदैवत इंदासी माता यांचेही याठिकाणी वेगवेगळे कुलदैवत मंदिराची स्थापना केली असून गावात दरवर्षी सुमारे चाळीस ते पन्नास नवसाच्या मानता असल्याने प्रत्येक चौकात नवसाच्य मानता असतात.यामुळे गावात पाहुणे मंडलिंची मोठ्या प्रमाणात गर्दीहि होते.दरम्यान या यातरोउत्सवात विविध खेळण्याची दुकाने, पाळनेवाले दाखल झाले असून रात्री मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशाचे आयोजनही केले आहे. या दोन्ही भवानी मातेच्या मंदिरावर विद्युत रोषणाई केली असून ग्रामपंचायतीने व कळमसरे महाराष्ट्र विद्युत कंपनीच्या कर्मचारिनी मंदिरापर्यंत विजेची सोय केली असून या यात्रोउत्सवला परिसरातील भाविकानी उपस्थिती देऊन यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन किरणसिंह राजपूत यांनी केले आहे.