मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिल आहे. त्यामुळे मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी पक्षाला रामराम केला आहे.
पाच वर्षांपूर्वी २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत राज ठाकरे यांनी भाजपच्या मोदी-शाह विरोधात प्रचार केला होता आणि त्यांनी या २०२४ च्या निवडणूकीत आज राजसाहेबांनी भूमिका बदलली. ती किती चूक, किती बरोबर, हे राजकीय विश्लेषक सांगतीलच. सध्याच्या काळात राजकीय नेते त्यांना हवे तेव्हा त्यांना हवी ती राजकीय भूमिका घेऊ शकतात असे यावेळी किर्तीकुमार शिंदे यांनी म्हटले आहे.