


मुंबई दि. ३१ – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशचा भव्य मेळावा उद्या रविवारी दिनांक ९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता मुंबईत चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, खासदार पुनम महाजन, आमदार आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती रिपाइं चे मुंबईचे प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे यांनी दिली आहे.
उद्या रविवारी आयोजित केलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशच्या मेळाव्याच्या पूर्व तयारीची पाहणी करण्यासाठी आज ना. रामदास आठवले यांनी चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानात सभा स्थळाला भेट दिली. यावेळी रिपाइंचे गौतम सोनवणे, सिध्दार्थ कासारे, साधु कटके, संजय डोळसे, अशोक भालेराव, रवि गायकवाड, दयाल बहादुरे, सुभाश साळवे, प्रभावती रणदिवे, अशोक घोक्षे, अशोक जाधव, वनिता वाघमारे आदि अनेक मान्यवर उपस्थित होते.



