हिवरे येथे भाजपा शाखेचे उदघाटन

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील हिवरे येथे भारतीय जनता पक्षाचे शाखेचे उदघाटन खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

 

मौजे हिवरे (मुक्ताईनगर) येथे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर व बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा शाखेचे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येऊन स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांना नवीन संघटनात्मक जबाबदार्‍या देण्यात आल्या, तसेच प्रमुख पदाधिकारी यांचे कडून मार्गदर्शन करण्यात आले.

 

यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर व बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके यांच्यासह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष  .डी एस. चव्हाण, नंदकिशोर महाजन,  रसाल पवार, भाजपा तालुकाध्यक्ष अध्यक्ष  प्रफुल जवरे, भाजपा ता.सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे, विनोद पाटील, राहुल राणे,  राजेंद्र सवळे,  हमीद तडवी, गोविंदा गोसावी, विलास धनगर, वामन टेके, दौलत तायडे, अफसर तडवी,  गोपाळ जाणे,  प्रमोद बाठे, भागवत कोळी,  सुनील अढाव,  राजू गोसावी,  संदीप न्हावी,  रामेश्वर कोळी,  नजीर तडवी, विष्णू कोळी,  रविंद्र बावस्कर,  सत्यम पाटील,  शिवानंद कोळी, .रफिक तडवी,  शंकर न्हावी,  निलेश बावस्कर,  प्रविण काटे, अरुण पाटील, दत्ता जुनारे,  अनिल रोटे,  अशोक तडवी,  गणेश संभारे,  जितेंद्र कोळी,  सचिन कोकाटे,  प्रकाश सरोदे,  माणिक कोळी, राजेंद्र बावस्कर,  स्थानिक भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content