Home प्रशासन एनआयएच्या महासंचालकपदी महाराष्ट्र एटीएस प्रमुख सदानंद दाते यांची नियुक्ती

एनआयएच्या महासंचालकपदी महाराष्ट्र एटीएस प्रमुख सदानंद दाते यांची नियुक्ती

0
138


नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | केंद्र सरकारने राष्‍ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालकपदी मंगळवारी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख सदानंद दाते  यांची नियुक्ती केली आहे. ते ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत या पदावार असतील. ते एनआयएचे विद्यमान डीजी दिनकर गुप्ता यांची जागा घेतील, जे ३१ मार्च रोजी निवृत्त होणार आहेत.

सदानंद खोते हे १९९० च्या महाराष्ट्र केडर बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. सदानंद दाते हे २६/११ च्या मुंबई हल्ल्यात मुंबई पोलिसांच्या विशेष ऑपरेशनमध्येही सहभागी होते. त्यांना या शौर्यसाठी राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले.


Protected Content

Play sound