Home Cities चाळीसगाव मेहुणबारे पं.स. गणातील पोटनिवडणुकीत भाजपचा विजय

मेहुणबारे पं.स. गणातील पोटनिवडणुकीत भाजपचा विजय

0
40

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील मेहुणबारे पंचायत समिती गणात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सुनंदा सुरेश साळुंखे यांनी दणदणीत विजय संपादन केला.

मेहुणबारे येथील पंचायत समिती गणाच्या सदस्या सौ रूपाली पियुष साळुंखे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर घेण्यात आलेल्या पोट निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार सौ सुनंदा सुरेश साळुंखे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार जयश्री नरेश साळुंखे यांचा जवळपास पंधराशे मतांनी पराभव करून विजयी झाल्या आहेत. यामुळे या गटावर पुन्हा एकदा खासदार उन्मेशदादा पाटील यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. या निकालामुळे पंचायत समिती चाळीसगावचे सत्ता परिवर्तन अवलंबून होते मात्र भाजपा उमेदवार विजय झाल्याने आता भाजपाच्या सभापती व उपसभापती यांना पुन्हा अभय मिळाले आहे.

या निवडणुकीत भाजपा, सेना, रासप, शिवसंग्राम, आर पी आय आदी पक्षांने पदाधिकारी यांच्यासह तालुका अध्यक्ष के. बी. साळुंखे, जि.प. सभापती पोपट तात्या भोळे, उपसभापती संजू पाटील सभापती दिनेश बोरसे, गटनेते संजू आबा, सदस्य सुनील पाटील, सुभाष दादा, माजी सदस्य धर्मा आबा, अनिल गायकवाड, पियुष साळुंखे व सरपंच, भाजपा पदाधिकारी आदींमुळे हा विजय साकार झाला.


Protected Content

Play sound