Home क्राईम अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी। चाळीसगाव तालुक्यातील एका गावातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील एका गावात १७वर्षीय अल्पवयीन मुलगी परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी ३ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. नातेवाईकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पिडीत मुलीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर गुरूवार ७ मार्च रोजी दुपारी २ वाजता पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय कुणाल चव्हाण हे करीत आहे.


Protected Content

Play sound