Home Cities अमळनेर शेतकऱ्यांच्या शेतातून ईलेक्ट्रीक केबल वायरची चोरी

शेतकऱ्यांच्या शेतातून ईलेक्ट्रीक केबल वायरची चोरी

0
68

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील करणखेडा शिवारातील वेगवेगळ्या शेतातून सुमारे २२ हजार रुपये किमतीच्या थ्री फेज इलेक्ट्रिक केबल वायरची चोरी केल्याची घटना गुरुवार २९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जीवन महारु शिसोदे वय-४८, रा. डांगरी ता. अमळनेर हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्यांचे अमळनेर तालुक्यातील करणखेडा शिवारात शेत आहे. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात २७ फेब्रुवारी रोजी रात्री ११ ते २९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता दरम्यान जीवन सिसोदे यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या शेतातून इलेक्ट्रिक केबल वायरची चोरी केल्याची घटना उघड केली आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे सुमारे २२ हजार रूपये किंमतीचे नुकसान झाले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर जीवन मारू सिसोदे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविारेधात गुरूवार २९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मुकेश साळुंखे हे करीत आहे.


Protected Content

Play sound