पंतप्रधानाच्या हस्ते जगातील सर्वात मोठया अन्नधान्य साठवणूक योजनेची झाली सुरूवात

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान मोदी यांनी २४ फेब्रुवारी रोजी सहकार से समृद्धी या कार्यक्रम अंतर्गत जगातील सर्वात मोठ्या सहकारी धान्य साठवणूक योजने प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. या योजनेंमुळे देशभरात धान्यसाठा येईल. ही योजना 11 राज्यांमधील 11 प्राथमिक कृषी पतसंस्था मध्ये कार्यरत आहे. उद्घाटनाचा कार्यक्रम दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला होता.

या योजनेने गोदामे आणि इतर कृषीशी संबंधति सुविधा निर्मितीसाठी देशभरात ५०० प्राथमिक कृषी पतसंस्था निर्माण केल्या जाणार आहे. अन्न सुरक्षा मजबूत करणे व अन्नधान्य पुरवठा साखळी सुरळीत ठेवणे हे प्राथमिक कृषीसंस्थेचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाने २,५०० कोटी रूपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला आहे. प्राथमिक कृषी पतसंस्था नाबार्डशी जोडून ते कार्यान्वित करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. त्यामुळे कोट्यवधी अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. नाबार्डने या प्रकल्पासाठी राष्ट्रीय स्तरावरील सामाईक सॉफ्टवेअर विकसित केले आहे, जे देशभरातील प्राथमिक कृषी पतसंस्थेच्या अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

 

Protected Content