धक्कादायक : विश्वास संपादन करून महिलेवर अत्याचार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेचा विश्वास संपादन करून वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात ४० वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. महिलेचे सानपाडा रेल्वे स्टेशन येथे राहणारा दिनेश पांडूरंग चौधरी याने महिलेशी ओळख निर्माण करत १ एप्रिल २०२३ रोजी पसून महिलेशी संपर्क करून तिचा विश्वास संपादन करून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा प्रकार महिलेला सहन न झाल्याने तिने शुक्रवारी २३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी दिनेश पांडूरंग चौधरी याच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे हे करीत आहे.

Protected Content