जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या अंतर्गत महाराष्ट्र इंटरनॅशनल या उपक्रमाची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील प्रशिक्षित उमेदवारांना विदेशामध्ये विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सोशल मिडीया चॅनलची स्थापना करण्यात आली आहे. या सोशल मिडीया चॅनलवर महाराष्ट्र इंटरनॅशनल अंतर्गत विदेशामध्ये असणाऱ्या विविध रोजगाराच्या संधीची सविस्तर माहिती प्रसारीत करण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत महाराष्ट्र इंटरनॅशनल अंतर्गत इस्त्राईलमध्ये बांधकाम क्षेत्रातील 10,000 पदांसाठी, यु.के.मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अधिपरिचारिकेच्या 120 पदांसाठी तर फिनलॅंडमध्ये काळजीवाहकच्या 50 पदांसाठी भरती होणार आहे. याबाबतचीही माहिती या चॅनलच्या माध्यमातून घेता येणार आहे.
महाराष्ट्र इंटरनॅशनल अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या सोशल मिडीया चॅनलमध्ये जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक युवतींनी सहभागी होऊन विदेशामध्ये रोजगारांच्या संधीचा लाभ घ्यावा. सदर चॅनलमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी खालील व्हॉटसॲप, टेलीग्राम व लिंक्डइन पेज ला सबस्क्राईब करावे.
WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029VaFSFjiKmCPXrP0ncr38
Telegram Channel: https://t.me/maharashtrainternational
LinkedIn Page: https://shorturl.at/hpwQW
या लिंकला भेट द्यावी व आजच आपला सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त वि. रा. रिसे यांनी केले आहे.