भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संतनगरी शेगाव येथून परत असताना भुसावळचे गोरक्षक रोहित महाले यांना लासूरा गावाजवळ बिकट परिस्थितीत एक वयोवृध्द व्यक्ती दिसले. त्यांच्या जवळ गेल्यास ते संकटात महालेंना जाणवले. त्यांना मराठी भाषा समजत नव्हती. त्यामुळे ते व्यक्ती परप्रांतीय असल्याचे निश्चित झाले. त्या फक्त तमिल समजत होती. ते तामिळनाडू राज्याचे महालेंना समजल्यास त्यांनी जी. एम. फाऊंडेशनचे अजय देशमुख यांच्याशी संपर्क साधला.
तत्काळ परिसरातील प्रतिष्ठीत व्यक्ती व पोलीसांच्या मदतीने गावात तमिल लोकांचा संम्पर्क झाला. त्या तमिल व्यक्तीला वयोवृध्दांने आपली व्यथा सांगितली. त्या वयोवृध्द व्यक्तीला त्याचे मित्रे सोडून गेले आणि त्याची बॅग चोरीला गेली असे निष्पण्ण झाले. पोटात जेवण नसल्याने तो वयोवृध्द रडू लागले.
मला जेवण करवून तामिळनाडूला पाठवून दया अशी विनंती त्या वयोवृध्द व्यक्तीनी केली. त्वरीत उपस्थितांनी तामिळनाडू पोलिसांशी संम्पर्क साधला. ते वयोवृध्द व्यक्ती पुढच्या दिवशी नवजीवन एक्स्प्रेसने जाणार आहे. या पवित्र कामात अजय देशमुख, गोरक्षक कृष्णा लांजुळकर, रोहित महाले व समस्त गोप्रेमी उपस्थित होते.