पोलीस पाटीलांना अतिरिक्त पदभार न देता रिक्त पदे भरा – संघटनेचे मागणी

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील अनेक गावात पोलीस पाटील हे पद रिक्त असून तेथे अतिरिक्त पदभार तहसीलदारांनी दिला आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अतिरिक्त पदभार न देता रिक्त पोलीस पाटील पदांची भरती करण्यात यावी अशी मागणी तालुका पोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोक पाटील यांनी केली आहे.

 

तालुक्यातील अनेक गावातील पोलीस पाटील पद विविध कारणांनी रिक्त आहे. या त्या गावातील नागरिकांना आपल्या महत्वाच्या कामासाठी  दाखले,उतारे व इतर महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी मोठया अडचणींना सामोरे जावे लागत आहे.  तर शासकीय योजना गावातील प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस पाटील यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते.  ही बाब लक्षात घेता तहसीलदार महेश पवार यांनी पुढील प्रमाणे रिक्त गावातील पोलीस पाटील या पदाचा कार्यभार शासकीय कामकाजाच्या सोयीने पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात सेवा वर्ग करण्यात आला आहे.

यात वाघझिरा येथील पो.पा.यांनी नोकरीनिमित्त पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी नसीमा निसार तडवी ईचखेडा, वाघोदा येथील पो.पा.सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी अशोक रघुनाथ पाटील गिरडगाव,किनगाव खुर्द येथील पो.पा.सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी रेखा दिनकर सोनवणे किनगाव बुद्रुक,उंटावद येथील पो.पा.सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी उमेश प्रकाश पाटील डोणगाव,महेलखेडी येथील पो.पा.सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी सलीम रमजान तडवी कोरपावली,वढोदा येथील पो.पा.मयत झाल्याने त्यांच्या जागी चंद्रकांत देविदास पाटील विरावली,मनवेल येथील पो.पा.मयत झाल्याने त्यांच्या जागी विठ्ठल गोरख कोळी दगडी,पिंपरी येथील पो.पा.निलंबित झाल्याने त्यांच्या जागी सचिन हिरालाल तायडे भालशीव,सातोद येथील पो.पा.सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी दीपक नारायण पाटील कोळवद,शिरसाड येथील पो.पा.सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी भूषण बापू पाटील नावरे,पिळोदे खुर्द येथील पो.पा.सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी गजानन नारायण चौधरी थोरगव्हाण हरिपुरा येथील पोलीस पाटील मयत झाल्याने त्यांच्या जागी युवराज जयसिंग पाटील मोहराळे,आडगाव येथील पो.पा.निलंबीत झाल्याने त्यांच्या जागी राकेश वासुदेव साठे चिंचोली,तर लंगडा आंबा येथील सुरुवातीपासूनच कार्यभार पोलीस पाटील उसमळी यांच्याकडे असल्याने पद रिक्त आहे व छत्तरसिंग जुगा बारेला जामण्या यांचेकडे पदभार आहे.

करंजी येथील पो.पा.सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी निलेश बंन्सीलाल सोनवणे रिधुरी,कोसगाव येथील पो.पा.सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी भरत रघुनाथ पाटील वनोली, बोरखेडा बुद्रुक येथील पद रिक्त असल्याने तेथील पदभार संजय सुरेश चौधरी न्हावी यांचेकडे,अकलूज येथील पो.पा.निलंबित झाल्याने त्यांच्या जागी सुरेश वामन खैरनार पाडळसा,दुसखेडा येथील पद रिक्त असल्याने तेथील पदभार कैलास रामचंन्द्र बादशहा कासवा तर अंजाळे येथील पद रिक्त असल्याने तेथील पदभार समाधान रवींद्र अडकमोल वाघळूद हे सांभाळतील तर नागरीकांच्या अडचणी समजून घेत वरील पो.पा.यांना तात्पुरत्ता पदभार मिळणेसाठी पो.पा.संघटनेचे तालुका अध्यक्ष व गिरडगावचे पो.पा.अशोक रघुनाथ पाटील व नायगावचे पो.पा.मनोज यादवराव देशमुख यांच्यासह पो.पा.यांनी प्रयत्न केले. यावेळी नायब तहसिलदार संतोष विनंते होते.

Protected Content