यावल येथे प्रजासत्ता दिनानिमित्त विविध सांस्कृतीक कार्यक्रम उत्साहात

yawal dwajarohan news

यावल प्रतिनिधी । तालुक्यात व शहरात विविध संस्थांच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन विविध सांस्कृतीक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावल तहसील कार्यालयात आणी पोलीस वसाहतीच्या प्रांगणावर तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी राष्ट्रीय ध्वजास परेडची सलामी दिली.

मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती
यावेळी विविध विभागाच्या शासकीय कार्यालयाचे अधिकारी विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील कला वाणिज्य महाविद्यालयातील प्रांगणात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणी नागालँड पेथे देशाचे रक्षण करणारे बी.एस.एफ.चे सैनिक विशाल बारी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मराठा प्रसारक संस्थेचे स्थानिक संचालक सुनिल भोईटे, वसंतराव भोसले. बाळासाहेब शिर्के, प्राचार्या डॉ. संध्या महाजन, माजी प्राचार्य डॉ.एफ.एन. महाजन, उपप्राचार्य प्रा.ए.पी. पाटील, प्रा.एम. डी. खैरनार, प्रा. संजय पाटील यांच्यासह विद्यालयाचे सर्वशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

दहिगाव तालुका यावल येथील आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा घेऊन प्रजासताक दिनाची भव्य प्रभातफेरी काढली तर जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी त्यास सहभाग घेवुन चांगला प्रतिसाद दिला. यात विद्यार्थ्यांनी सादर केलेले लेझीम खेळाने संपूर्ण गावाचे लक्ष वेधून घेतले. यात गावाच्या प्रमुख चौकात इयत्ता दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम असे लेझीमचे खेळ साजरे केलेल्या प्रत्याक्षिकाला ग्रामस्थांनी चांगता प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे खाजगी शाळांच्या तुलनेत आता शासकीय शाळाही वरचढ ठरत आहेत हे सिद्ध करून दाखविले येथील शाळेतील शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे सर्व गावकऱ्यांकडून कौतुक होत आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख चौकात सरपंच साजिया तडवी व गणेश दूध संस्थेचे संचालक उंब्रज फेगडे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उर्दू शाळा आदर्श विद्यालय, जि.प.मराठी मुलांची शाळा, विकासो व ग्रामपंचायतीसमोर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यात माजी जि.प.सदस्य सुरेश देवराम पाटील, कृउबा संचालक उपसरपंच देविदास पाटील, दूध संस्थेचे चेअरमन किशोर महाजन यांचेसह सर्व लोकप्रतिनिधी व अनेक ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Protected Content