वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात  राष्ट्रीय गणित दिवस साजरा

 

जळगाव, प्रतिनिधी । गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. या दिनाचे अवचित्त्य साधून विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मँथेमॅटीक्स ट्रिक्स’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

‘मँथेमॅटीक्स ट्रिक्स’ कार्यशाळेला प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डी. एस. भारंबे, शशिकांत नेहते यांची उपस्थिती होती. शशिकांत नेहते यांनी मराठी विज्ञान परिषद विषयी माहिती दिली. प्रा. डी. एस. भारंबे यांनी गणितातील विविध क्लुप्त्या व सूत्र या गणितीय साधनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यत पोहचवल्यात. सहसा सर्वांनाच कठीण वाटणारा गणित हा विषय कमीत कमी वेळेत सोपा कसा करावा या विषयावर अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. गणिताबद्दलचा असलेला न्यूनगंड विद्यार्थ्यांच्या मनातून काढण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. भौतिक शास्त्र व गणित या विषयांचा परस्पर समन्वय विविध प्रयोगातून साधून विद्यार्थ्यांचे मनोरंजनातून गणित विषय सोप्या भाषेत सांगितला. विद्यार्थ्यांनी स्वत: या प्रयोगातून गणित विषयाचा आनंद लुटला.

याप्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन आशा पाटील यांनी केले. मान्यवरांचा परिचय डॉ. वैजयंती चौधरी यांनी केला तर आभार महाविद्यालयाचे समन्वयक उमेश इंगळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी हितेश ब्रिजवासी, हितेंद्र सरोदे, सुनील बारी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कामकाज पहिले.

Protected Content