Home Cities चाळीसगाव मोठी बातमी : पंडित प्रदीप मिश्रा येणार चाळीसगावात !; उत्सुकता शिगेला

मोठी बातमी : पंडित प्रदीप मिश्रा येणार चाळीसगावात !; उत्सुकता शिगेला

0
64

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | प्रख्यात कथाकार विद्यावाचस्पती पंडित प्रदिप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन येत्या १६ तारखेपासून शहरातील मालेगाव रोड परिसरात करण्यात आल्याची माहिती असून यामुळे भाविकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

पंडित प्रदिप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन चाळीसगाव शहरातील मालेगाव रोडवरील आशिष हॉटेल जवळ येत्या १६ जानेवारी रोजी पासून करण्यात आले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या माध्यमातून ही कथा भरविण्यात आले असून १६ ते २१ जानेवारी दरम्यान कथा पार पडणार आहे.

या कालावधीत दररोज दुपारी ३ ते ५ यावेळी पंडित प्रदिप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा ऐकता येणार आहे. तत्पूर्वी कार्यक्रमाला अवघे सात दिवस बाकी आहे. परंतु तालुक्यासह आजूबाजूचे तालुक्यातील भाविकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

चाळीसगावात पंडित प्रदीप मिश्रा येणार असल्याचे निश्‍चीत झाल्याचे मानले जात आहे. या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रस्तुत प्रतिनिधीने खासदार उन्मेषदादा पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता झाला नाही. तर त्यांच्या सौभाग्यवती संपदाताई पाटील यांनी चाळीसगावात शिव महापुराण कथेच्या आयोजनाची तयारी सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच आज कथा संपत असतांना पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी मुंबईतील दिनांक १६ ते २१ जानेवारी दरम्यानची शिव महापुराण कथा ही चाळीसगावात होणार असल्याची घोषणा केली. यामुळे आता चाळीसगावात श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जयघोष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


Protected Content

Play sound