पुणे-यावल बसला अपघात : प्रवासी जखमी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पुण्याहून यावल येथे येणार्‍या बसला आज दुपारी अजिंठा गावाजवळ झालेल्या अपघातात प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्याचे वृत्त आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, आज सकाळी पुण्याहून निघालेल्या एमएच४० वायवाय- ६१९१ क्रमांकाच्या बसला आज अजिंठा गावाजवळ अपघात झाला. एका तरूणीला वाचविण्याच्या प्रयत्नात बस चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या बाजूला नेली. येथे असलेल्या खड्डयात बस न कोसळला ती अधांतर लटकली. यामुळे बसमधील चार-पाच प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या. मात्र, चालकामुळे भीषण अपघात टळल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळतच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन प्रवाशांना बसमधून काढण्यासाठी मदत केली. सोयगाव आगाराच्या कर्मचार्‍यांनी देखील घटनास्थळी पोहचून मदतकार्य केले. सदर बस ही यावल आगाराची असल्याचे वृत्त येथील आगाराच्या सूत्रांनी सांगितले.

Protected Content