पिंपरी चिंचवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । पिंपरी चिंचवड येथील फटाक्याच्या गोदामाला अचानक भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या भीषण आगीत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेक कामगार अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आले आहे. या घटनेमुळे अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आगीत फसलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये मोठी आग लागलेली आहे, आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर आणखी काही कामगार त्यात फसल्याच बोलले जात आहे. तळवडे येथील फटाका गोदामाला ही आग लागली होती, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. हे फटाका गोदाम विनापरवाना सुरू असल्याचे देखील माहिती समोर येत आहे. दरम्यान, ही आग लागल्यानंतर काही वेळातचे आगीने रूद्रावतार घेतले. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. दुसरीकडे सात ते आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल आहेत. आत्तापर्यंत सात मृतदेह बाहेर काढण्यात आलेल्या आहेत, आणखी कामगारांचा शोध सुरु आहे.