चाळीसगाव-लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दसेगाव-उंबरखेड रस्त्यावरून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरला मेहूणबारे पोलीसांनी रात्री पेट्रोलिंग करीत असताना पकडले आहे . याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाले आहे.
तालुक्यातील मेहुनबारे पोलीस स्थानकाचे सपोनि संदीप परदेशी यांच्यासह सोबत पोलीस कॉन्स्टेबल गोरक चकोर, जितू सिंग परदेशी ,निलेश लोहार,भूषण बाविस्कर, अशोक राठोड, असे पोलीस स्थानक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गिरणा नदी पात्राकडून दसेगाव-उंबरखेड रोडवर अचानक निळ्या रंगाचा सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर जात असताना दिसून आला. त्यावर पोलिसांना संशय बळावल्याने सदर ट्रॅक्टर थांबवून ट्रॅक्टर चालकास विचारपूस केली. परंतु ट्रॅक्टर चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने ट्रॉलीमध्ये डोकावून बघितले असता सदर ट्रॉलीमध्ये रेती मिळून आल्या.
दरम्यान चालकास वाळू वाहतूक परवाना बाबत विचारणा केली असता तसा कोणताही परवाना नसल्याबाबत त्यांनी सांगितले. त्यावर पोलिसांनी सदर ट्रॅक्टर पोलीस स्थानकाच्या आवारात जमा करून सदर इस्मा स्विरुद्ध मेहुणबारे पोलीस स्टेशनला पोलीस कॉन्स्टेबल निलेश गोकुळ लोहार यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सहायक फौजदार मिलिंद वामन शिंदे हे करीत आहे.