संचीत रजा संपल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला तांबापूरा परिसरातून अटक;

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खूनाच्या गुन्ह्यात नाशिक कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला बंदी गुड्डू उर्फ कानशा वहाब शेख (वय २६, रा. तांबापूरा) हा संचित रजेवर आला होता. रजा संपल्यानंतर तो सुरत येथे पळून जात असतांना एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता तांबापूरा परिसरातून अटक केली.

शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खूनाच्या गुन्ह्यात गुड्डु उर्फ कानशा वहाब शेख याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नाशिक कारागृहात तो शिक्षा भोगत होता. २१ नोव्हेंबर रोजी त्याला २१ दिवसांची संचित रजा मंजूर झाल्यानंतर तो बाहेर आला होता. १३ डिसेंबर रोजी त्याची रजा संपल्यानंतर देखील तो कारागृहात हजर झाला नाही. त्यामुळे कारागृह शिपाई महेंद्र मंगल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी आरोपीचा शोधार्थ पथक तयार करुन रवाना केले. ४८ तासाच्या आत मंगळवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता आरोपी गुड्डु उर्फ कानशा वहाब शेख हा सुरत येथे पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांनाच तांबापूरा परिरातून अटक केली आहे. दुपारी ३ वाजता आरोपीला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

Protected Content