बाबुलाल पाटील अमळनेर विमा शाखेत सलग चौथ्यांदा एमडीआरटी !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील बाबुलाल यशवंत पाटील यांची नुकतीच एल आय सी अमळनेर विमा शाखेत एमडीआरटी चौथ्यांदा निवड झाली असून ते अमेरिकेच्या दौर्‍यासाठी पात्र ठरले आहेत.

अमळनेर शाखेचा इतिहासात चौथ्यांदा एमडीआ टी करणारे एकमेव एजंट आहेत. एमडीआरटी एजंट म्हणजे तो १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत दहा लाख डॉलर्स इतका विमा व्यवसाय खरेदी करतो.
एमडीआरटी सदस्यता ही आंतरराष्ट्रीय जीवन विमा आणि आर्थिक सेवा व्यवसायात उत्कृष्ट म्हणून ओळखली जाते. त्यात बाबुलाल पाटील यांची अमळनेर शाखेतून सलग चौथ्यांदा निवड झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनदंन होत आहे.

१९२७ मध्ये स्थापित झालेल्या, मिलियन डॉलर राउंड टेबल (एमडीआरटी), द प्रीमिअर असोसिएशन ऑफ फायनान्शियल प्रोफेशनल्स हे ७८ देशांतील ४३० पेक्षा अधिक कंपन्यांमधील जगातील ३६,००० अग्रणी जीवन विमा आणि वित्तीय सेवा व्यावसायिकांचे आंतरराष्ट्रीय, स्वतंत्र संघटना आहे. एमडीआरटी सदस्य अपवादात्मक व्यावसायिक ज्ञान, कठोर नैतिक आचरण आणि उत्कृष्ट ग्राहक सेवा प्रदर्शित करतात.

बाबुलाल पाटील यांनी सन २०२० या वर्षात अमळनेर शाखेत प्रथम येण्याचा बहुमान मिळाला होता सण २०२१ दुसर्‍यांदा आणि सण २०२२ तिसर्यांदा आणि २०२४ मध्ये चौथ्यांदा एमडीआरटी त्यांची निवड झाली त्यांच्या निवडीसाठी वरीष्ठ शाखाधिकारी, गोपाल सोलंकी,विकास अधिकारी तुषार झेंडे संजय शेटे, यांचे मार्गदर्शनही लाभले.

त्यांच्या या निवडीबद्दल चोपडा शाखेतील शाखाधिकरी महेंद्र ठाकूर,अमळनेर एल आय सी शाखेतील सुमित कुमार, हिमांशू सिंग,तुषार झेंडे ,मिलिंद मिसर, अजय रोडगे ,नितिन पाटील , , गणेश अकनगीरे, नीरज मोरे,, राहुल शिरसाठ, निवृत्ती बोडके,संधान साहेब, भगत साहेब, सौ, सरला पाटील, अपर्णा मुळे, दीपा बाग, अश्विनी ब्राम्हणकर प्रमोद शिंपी, केशव चव्हाण, विनोद आगलावे, विनोद बडगुजर,भूषण पाटील, दामू धनगर, विशाल खर्डेकर,पियुष शहा, सुदर्शन सोनवणे,मनोज नेरकर, अभिमन्यू तातोडे विकार शेख,नीरज मोरे,नितीन चव्हाण,दीपक भोई, संदीप कुलकर्णी, ,संभाजी पाटील,शैलेश चौधरी, वैभव पाटील, मिलिंद मोरे,यांच्यासह देशदूतचे संपादक हेमंत अलोने व्यावसथापक विजय महाजन,पत्रकार बांधव, कळमसरे ग्रामस्थ व अनेकांनी अभिनदंन केले आहे.

यावेळी प्रस्ताविक उपशाखाधिकरी सुमीत कुमार यांनी केले तर वरीष्ठ शाखाधिकारी गोपाल सोलंकी विकास अधिकारी तुषार झेंडे, निवृत्त विकास अधिकारी संजय शेटे, पत्रकार शामकांत पाटील यानी मनोगत व्यक्त केले तर आभारप्रदर्शन सहाय्यक प्रशासन अधिकारीहिमांशू सिंग यांनी केले.

Protected Content