कैद्यांना पिस्तूल पुरवणार्‍या चौथ्या आरोपीला अटक

जळगाव प्रतिनिधी । जळगाव कारागृहातून फरार होणार्‍या कैद्यांना पिस्तुल पुरवणारा करण रतीलाल पावरा हा चौथा आरोपी आता गजाआड करण्यात आला आहे.

जळगाव कारागृहातून २५ जुलै रोजी सुशील मगरे, सागर पाटील व गौरव पाटील हे तिघे पिस्तूलचा धाक दाखवत कारागृहातून पळून गेले होते. त्यांना जगदीश पाटील, गौरव, अमित चौधरी, नागेश पिंगळे व करण पावरा यांनी मदत केल्याचे पोलिस तपासात दिसून आले होते. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवरून जगदीश पाटील, सागर, अमित, नागेश व गौरव या चौघांनाही अटक केली. सर्वजण सध्या कारागृहात आहेत. दरम्यान, यातील मुख सूत्रधार मगरे याला देण्यासाठी करणने उमर्टी येथून एक पिस्तूल जळगावात आणले. हे पिस्तूल मगरेचा जुना साथीदार अमित चौधरी याच्याकडे दिले. नंतर अमितने कारागृहाच्या मागील भिंतीवरून हे पिस्तून आत फेकले. याचा पिस्तूलच्या धाकावर मगरे, गौरव व सागर पाटील हे तिघे पळून गेले.

पोलिसांच्या पथकाने चोपडा तालुक्यातील गलंगी येथे सापळा रचून करण पावरा याला अटक केली. नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने, दीपक शिंदे व प्रवीण हिवराळे या पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली आहे. करणला १९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Protected Content