भीषण अपघातात मोटार सायकल स्वार जागीच ठार : महिला जखमी (व्हिडीओ)

pachora accident

पाचोरा, प्रतिनिधी | शहरातील जामनेर रस्त्यावर सिंधी कॅम्प भागात साईमोक्षजवळ मोटारसायकल व पिकप वाहनाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वार जागीच ठार तर एक महिला जखमी झाल्याची घटना आज (दि.३) दुपारी घडली.

 

मोटरसायकल स्वार वरखेडीहुन पाचोऱ्याकडे येत होता व पिकपवाला पाचोऱ्यातून जामनेरकडे जात असताना हा अपघात घडला. अपघातातील मृत व जखमी यांची ओळख पटली नसून शोध सुरु आहे. जखमी महिलेस उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

 

Protected Content