Home Cities मुक्ताईनगर भाजप शहराध्यक्ष रामेश्वर ढोले सहकार्‍यांसह राष्ट्रवादीत दाखल

भाजप शहराध्यक्ष रामेश्वर ढोले सहकार्‍यांसह राष्ट्रवादीत दाखल

0
43

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील काकोडा येथील भाजप शहराध्यक्ष रामेश्‍वर ढोले यांनी आ. एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची धर्मनिरपेक्ष विचारसरणी पक्षाचे ध्येय धोरणे यामुळे प्रभावित होऊन माजी मंत्री आ एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांच्या विकासात्मक दृष्टीकोनावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

यात काकोडा येथील भाजपा शहर अध्यक्ष रामेश्वर ढोले तसेच गजानन मनोहर भोलाणकर यांच्या सह बोरखेडा जुने येथील विकास पवार , विलास पवार, सुभाष चव्हाण,अनिल मानसिंग चव्हाण ,रामदास राठोड, रमेश पवार, आकाश चव्हाण, मिराबाई मुर्‍हेकर, सविता पवार, किरण पवार, दुर्गाबाई राठोड, मेहराम राठोड, महादेव मुर्‍हेकर, मंगेश मुर्‍हेकर, कविता मुर्‍हेकर आणि सहकार्‍यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. आ. एकनाथराव खडसे व रोहिणी खडसे यांनी त्यांच्या गळ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा दुपट्टा घालून सर्वांचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात स्वागत केले

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ड रोहिणी खडसे मार्गदर्शन करताना म्हणाल्या आपण सर्व प्रवेश करणार्‍यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात स्वागत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा छञपती शिवराय, छञपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी आणि लोकाभिमुख विचारांवर चालणारा पक्ष असून संविधानाचा आदर, लोकशाही मूल्यांचे जतन करणारा, समजातील वंचीत घटकांप्रती सामाजिक न्यायाची भावना जपणारा शेतकरी, कष्टकरी हित जपणारा पक्ष आहे. या पक्षात सर्व जातिधर्म , गोरगरिब यांना न्याय आणि नेतृत्वाची संधी मिळते. शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल सूरू आहे. काकोडा, बोरखेडा गावाच्या विकासात आ. एकनाथराव खडसे यांचे मोठे योगदान असुन आगामी काळात सुध्दा आ .एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील आणि पक्षाच्या माध्यमातुन गावाच्या विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल

यावेळी आ. एकनाथराव खडसे म्हणाले राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देणारा पक्ष असून विकास कामांना प्राधान्य देणारा पक्ष आहे. गेले तीस वर्षात काकोडा गावातील विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला भविष्यात सुद्धा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. बोरखेडा येथे सुद्धा विकास कामांना निधी दिला. आगामी काळात सुद्धा राहिलेल्या कामांना निधी देण्यात येईल.

सर्वांचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात स्वागत असून सर्वांनी पक्षाचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवा व आगामी काळात होणार्‍या निवडणुका मध्ये पक्षाला यश मिळवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करा असे आवाहन केले. यावेळी कुर्‍हा येथील सरपंच डॉ बी. सी. महाजन, शिवा पाटील, मनोज हिवरकर, बाबाराव हिरोळे, लक्ष्मण पाटील, संतोष पवार उपस्थित होते.


Protected Content

Play sound