यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील नगरपालिका प्रशासनाच्या वतीने बेकायदेशीर पाणीपट्टी वसुली करण्यात येत असून आपण याच्या विरोधात जिल्हाधिकार्यांकडे दाद मागणार आहोत अशी माहिती माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी दिली आहे.
यावल नगर परिषद कार्यक्षेत्रातील विस्तारित कॉलनी भागात नगर परिषदे च्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत असुन या वर्षी नगर परिषद च्या माध्यमातुन नागरीकांना मागील वर्षाचे बिल आकारणीसाठी लागून आल्याने नगर परिषदच्या कारभारावर विस्तारीत क्षेत्रातील नागरीकांच्या वतीने संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहे.
यावल नगर परिसदच्या माध्यमातून व्हावा म्हणून तडवी कॉलनी भागात दहा लक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्यात आलेला असून विस्तारित भागात वितरण व्यवस्थेसाठी पाईपलाईन सुद्धा टाकण्यात आलेली आहे. पाणी मिळण्याच्या आशेने कॉलनी भागातील लोकांनी नगरपरिषदकडे अधिकृत रक्कम भरणा करून नळ जोडणी केली आहे.नळजोडणी घेत असताना नळ धारकांनी आगाऊ वार्षिक पाणीपट्टी शुल्क भरणा केले नंतरच नगरपालिकेतर्फे नड जोडणी दिली जाते. मार्च २०२२ पर्यंत पाईप लाईन द्वारे घेण्यात आलेल्या नळ धारकांना पाणीपुरवठा झालेला नव्हता.म्हणून अशा ३२८नळ धारकांना पाणीपट्टी आकारण्यात येऊ नये अशी मागणी विस्तारित भागातील रहिवासी व माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी केली होती व ती मागणी मंजूर देखील करण्यात आली होती.
त्याप्रमाणे मागील वर्षी नवीन नळ धारकांना कुठलीही पाणीपट्टी न आकारता यावल नगरपरिषदने दिलासा दिला होता. मात्र यावर्षी म्हणजे सन२०२३ / २४च्या कालावधीतील नगर परिषदच्या वतीने पाठवण्यातआलेल्या पाणीपट्टी बिलाचे अवलोकन केले असता मागील वर्षाची थकबाकी पंधराशे रुपये व व्याज १२० रुपये असे एकूण मागील थकबाकी रक्कम १६२० रू मागील बाकी या सदराखाली आहे असे भासवून मागणी केली आहे.
मागील वर्षी अतुल पाटील यांच्या मागणीनुसार चौकशी होऊन सदरची पाणीपट्टी जी नगर परिषदेने स्वरूपात घेतली होती ती समायोजित करण्याबाबत यावल नगर परिषदचे प्रशासक तथा प्रांताधिकारी कैलास कडलक यांनी मान्य करून तसा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवलेला होता. असे असताना देखील नगरपरिषदेच्या कर निर्धारण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विस्तारित भागातील नळ धारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
याबाबत अतुल पाटील यांनी म्हटले आहे की नगर परिषदने नुकतेच चालु वर्षाचे पाणीपट्टी बिल विस्तारीत क्षेत्रातील रहीवाशी नागरीकांना केले असुन त्यामध्ये मागील वर्षाचे थकबाकी या सदराखाली सोळाशे विस रूपयांची मागणी करण्यात आली आहे . या संदर्भात नागरीकांनी आपल्याशी संपर्क साधुन नगर परिषदला लेखी निवेदन देवुन नळधारकांकडे थकबाकी नसुन नगर परिषद प्रशासनाकडुन नळजोडणी करतांना नळ धारकांकडुन आगाऊ वार्षीक पाणीपट्टी शुल्क आकारणी करीत घेण्यात आले आहे. तसेच, मागील वर्षाची पाणीपट्टी जमा झाली असुन त्याचे समायोजन न झाल्यास आपण जिल्हाधिकारी यांचेकडे दाद मागणार असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.